शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

प्लॅस्टिकवर बंदी म्हणजे असून अडचण, नसून..! पर्याय न देताच बंदी : निर्णयावर हवा सकारात्मक विचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 00:47 IST

सांगली : राज्य शासनाने संपूर्ण राज्यात प्लॅस्टिक बंदी जाहीर केली आणि निर्णयाच्या स्वागताबरोबरच संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. पर्यावरणप्रेमींनी त्याचे स्वागत केले,

शरद जाधव ।सांगली : राज्य शासनाने संपूर्ण राज्यात प्लॅस्टिक बंदी जाहीर केली आणि निर्णयाच्या स्वागताबरोबरच संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. पर्यावरणप्रेमींनी त्याचे स्वागत केले, तर व्यापाऱ्यांनी त्यावर नापसंती व्यक्त केली. व्यापाºयांचा प्लॅस्टिक बंदीला विरोध नसला तरी, त्याला पर्याय द्या आणि मगच बंदी घाला, अशी मागणी केली आहे. प्लॅस्टिक पिशव्यांची सर्वाधिक गरज असलेल्या किरकोळ विक्रेत्यांच्या अडचणींचा विचार करत त्यांना पर्याय आणि प्लॅस्टिक बंदीची प्रभावी अंमलबजावणी यावर निर्णयाचे यश अवलंबून आहे.

प्लॅस्टिकचा बेसुमार वापर व त्यामुळे पर्यावरणाचा होत असलेला ºहास यावर चिंता व्यक्त होत आहे. त्यामुळे यापूर्वी तीन वेळा प्लॅस्टिकवर बंदी घालण्यात आली असली तरी, त्याच्या अंमलबजावणीला अनेक कारणांनी खोडा बसत होता. काही घटकांनी निर्णयाचे स्वागतही केले, तर व्यापारी, विक्रेते, उत्पादकांनी मात्र नाराजी व्यक्त केली. प्लॅस्टिक पिशव्यांना पर्याय असणाºया कागदी अथवा कापडी पिशव्यांचा विषय समोर आला. त्याच्या उत्पादनात आता तरी मर्यादा असल्याने अनेक किरकोळ विक्रेत्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. किरकोळ विक्रेत्यांना लागणाºया प्रमुख साधनांत या पिशव्या असूनल त्यांना पर्याय उपलब्ध करून देण्याचे आव्हान शासनासमोर आहे.याठिकाणी होतो : पिशव्यांचा वापरकिराणा दुकान, भाजीपाला विक्रेते, मटण, चिकन यासह अनेक ठिकाणी प्लॅस्टिक पिशव्यांचा सर्रास वापर होतो. मटण, चिकन, मासे आदीमध्ये तर प्लॅस्टिक पिशव्यांमुळे माल व्यवस्थित राहत असल्याचा दावा विक्रेते करत आहेत. तरीही प्लॅस्टिक पिशव्यांचे दुष्परिणामही लक्षात घ्यावेतॉ, अशी अपेक्षा काहीजण व्यक्त करत आहेत.प्लॅस्टिक पिशवी काही सेकंदात तयार होते, तर ती नष्ट करण्यासाठी काही वर्षांचा कालावधी लागत असल्याने, आता समाजातील सर्वच घटकांनी प्लॅस्टिक पिशव्यांचा व इतर वस्तूंचा सोस सोडणे आवश्यक बनले आहे. प्लॅस्टिक पिशवी कितीही सोयीची असली तरी, शेवटी आपण स्वत:च पर्यावरणाच्या हानीला कारणीभूत ठरत आहोत, हेही विसरून चालणार नसल्याने शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी करत, जेवढा होता होईल तेवढा प्लॅस्टिकचा वापर कमी करणे नागरिकांच्याच हाती आहे. किरकोळ विक्रेत्यांना मालाच्या पॅकिंगसाठीही नवा आणि सुलभ पर्याय दिला, तरच सर्व घटकांकडून या निर्णयाचे स्वागत होणार आहे.

 

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीSangliसांगली